महाराष्ट्रात 2,436 नवीन कोरोना रुग्ण, एकूण रुग्णसंख्या पोहोचली 52,667 वर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – राज्यात सोमवारी कोरोनाचे २,४३६ नवे रुग्ण सापडले. आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ५२,६६७ वर पोहोचली आहे. दिवसभरात ६० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण कोरोना बळींचा आकडा १,६९५ वर गेला आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात १,१८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता राज्यात एकूण १५,७८६ रुग्ण काेरोनातून बरे झाले आहेत. सोमवारी मुंबईतील ३८, पुणे ११, नवी मुंबई ३, ठाणे २, औरंगाबाद २, सोलापूर, कल्याण-डोंबिवली आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. बिहारच्या एका नागरिकाचा मुंबईत कोरोनाने मृत्यू झाला आहे.

रुग्णांचा तपशील

: मुंबई मनपा ३१९७२, ठाणे ४५७, ठाणे मनपा २७३९, नवी मुंबई २०६८, कल्याण-डोंबिवली ९४१, उल्हासनगर १८०, भिवंडी- निजामपूर ९८, मीरा-भाईंदर ४७५, पालघर १२०, वसई-विरार ५९७, रायगड ४३१, पनवेल ३६०, नाशिक मंडळ १६१८, पुणे मंडळ ६९३३, कोल्हापूर मंडळ ५२७, औरंगाबाद मंडळ १५०८, लातूर मंडळ २४९, अकोला मंडळ ७६६, नागपूर ५७७, इतर राज्ये ५१.


पुणे विभागातील ३ हजार ४४२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७ हजार २१८ झाली आहे. तर रुग्ण ३ हजार ४३५ आहे. विभागात कोरोना बाधित एकूण ३४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २१२ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात दिवसभरात ४५९ रुग्ण, दहा मृत्यू

पुणे जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने कहर केला असून दिवसभरात ४५९ रुग्ण सापडले असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ६ हजार १५९ एवढी झाली असून मृतांचा आकडा २८० पर्यंत पोहोचल्याचे प्रशासनाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *