कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली महत्त्वाची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ मार्च । राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे.’

‘देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी आणि देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होतो आणि झालेला आहे. उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने 200 आणि 300 रुपये प्रतिक्विंटल शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसाच्या मदतीवरून विरोधकांना सुनावलं. विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले, छगन भुजबळ यांनी अवकाळी पावसाचा मुद्दा उपस्थित केला आहे. या संदर्भात शासनाने तत्काळ माहिती मागवली आहे. यामध्ये आठ जिल्ह्यांमध्ये एकूण 13 हजार सातशे 29 हेक्टर एवढं नुकसान झालं आहे. ज्यामध्ये पालघरमध्ये विक्रमगट आणि जव्हार या भागामध्ये सातशे साठ हेक्टर क्षेत्रावर आंबा आणि काजूचं नकुसान झालं आहे. नाशिकमध्ये निफाड, त्र्यबकेश्वर, नाशिक या तालुक्यांमध्ये दोन हजार सातशे 85 हेक्टरवर गहू, भाजीपाला आणि द्राक्ष आणि आंबा पिकाचं नुकसान झालं आहे. धुळ्यामध्ये साक्री, शिरपूरमध्ये तीन हजार एकशे चौरेचाळीस हेक्टवर गहू, मका ज्वारी, पपई, केळी या पिकांचं नुकसान झालं आहे. नंदूरबारमध्ये 1576 हेक्टरवर गहू, हरभारा, मका, पपई, केळी, आंबा पिकांचं नुकसान झालं आहे. जळगावमध्ये 215 हेक्टरवर गहू, ज्वारी मका केलीचं नुकसान झालं आहे, अशी माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली.

मागच्या काळात चक्रीवादळ आले होते, त्यावेळी पैसे दिले नव्हते, त्यामुळे राजकीय बोलू देऊ नका. यावर कोणतेही राजकारण करू नका. आतापर्यंत आलेली सगळी माहिती दिली आहे. या नुकसानीबद्दल तत्काळ मदत दिली जातील. एक गोष्ट मदत आहे, विरोधी पक्षांना फक्त शेतकऱ्यांच्या मुद्यावर राजकारण करायचे आहे. हे मगरीचे अश्रू आहे. कोकणावर संकट आले तेव्हा आम्ही मदत केली होती. कांदा उत्पादकांना मदत दिली जाणार आहे. काल अवकाळी पाऊस आला, याचे तत्काळ पंचनामे करण्यात आले आहे. पंचनामे केल्याशिवाय मदत दिली जात नाही, हे विरोधकांना माहिती आहे. फक्त विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. कांदा उत्पादकांना सरकार मदत करेल. अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे. विरोधकांनी सभात्याग केले आहे, ते केवळ राजकारण आहे, अशी टीका फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *