Exchange ऑफेरमध्ये केवळ ४ हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार Samsung चा ‘हा’ 5G स्मार्टफोन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ मार्च । SamSung ही ऐक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणि फीचर्स असतात. आता देशातील अनेक शहरांमध्ये ५जी सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आता ५जी सेवेसाठी योग्य असलेलेच स्मार्टफोन खरेदी करण्यावर भर देत आहेत.

जर तुम्ही सुद्धा ५जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि कमी बजेट असल्यामुळे तो विचार सोडून देत असाल तर तुमच्यासाठी एकनवीन ऑफर सुरु आहे. या ऑफरमधून तुम्ही ५जी फोन केवळ ३,९४९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या किंमतीमध्ये तुम्ही Samsung Galaxy M53 हा फोन खरेदी करू शकता. ज्यामध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरायला मिळणार आहे.

Samsung Galaxy M53 5G या स्मार्टफोनची किंमत ३२,९९९ रुपये इतकी आहे. मात्र Amazon वर ३३ टक्के सूट मिळालण्यानंतर हा फोन २१,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच या फोनवर १८,०५० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तुम्ही एक्सचेंज ऑफरचं योग्यपणे लाभ घेऊ शकलात तर हा फोन केवळ तुम्ही ४,००० रुपयांमध्ये खरेही करू शकता. हा स्मार्टफोन ५जी असून यामध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज येते.

काय आहेत फीचर्स ?
या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला ६.७ इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले मिळतो. तसेच यामध्ये ५०००mAh ची बॅटरी आहे. फोनच्या मागच्या बाजूस ४ कॅमेरे आहेत. ज्यात मुख्य कॅमेरा हा १०८ मेगापिक्सल, दुसरा हा ८ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचे २ कॅमेरे आहेत. वापरकर्त्यांना यामध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *