Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र राजकीयदृष्टया सुसंस्कृत राज्य आहे. पण …. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावले खडे बोल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ मार्च । राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीचा सुप्रमी कोर्टातील आज अखेरचा दिवस आहे. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde) सुनावणी दरम्यान आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांनी खडे बोल सुनावले. सरकार पडेल अशी कृती राज्यपालांनी टाळायला हवी होती, असं सरन्यायाधीशांनी सुनावले. (Maharashtra Political) महाराष्ट्र राजकीयदृष्टया सुसंस्कृत राज्य आहे. पण अशा प्रकरणांमुळे राज्याला कलंक लागतो असं सरन्यायाधीश म्हणाले. 

आज महाधिवक्ते तुषार मेहता राज्यपालांच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत. महाराष्ट्र येऊन दाखवा, तुमचं फिरणं अशक्य करू अशा 47 आमदारांना धमक्या आल्या असं ते कोर्टात म्हणाले. यावर कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. आता निकालाच्या तारखेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिंदे गटाच्या वतीने काल ज्येष्ठ वकील हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला. राज्यपालांच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता आज युक्तिवाद सुरु आहे.

राज्यपालांनी कृती योग्य नाही?
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित करुन खडे बोल सुनावले आहेत. शिवसेना आणि महाविकासाघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंनतर राज्यापालांनी सरकारला बहुमत चाचणीसाठी एकही पत्र लिहीले नाही. मात्र, एकाच आठवड्यात राज्यपालांनी सहा पत्रं कशी लिहीली? राज्यपालांचे पत्र म्हणजे सरकार पाडण्याचे पहिले पाऊल ठरत आहे. ही राज्यपालांनी कृती योग्य नाही, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.


सरकार पडेल असं कृत्य राज्यपालांनी करायला नको होतं. विरोधी पक्षनेत्याचं राज्यपालांना पत्र ही नवी बाब नाही. महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत राज्य आहे. अशा प्रकरणामुळे राज्याला कलंक लागला आहे. 4 आमदारांपैकी गटनेत्याचाच मुद्दा योग्य वाटतो. दरम्यान, त्याआधी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मोठी टिप्पणी केली होती. फूट पडल्यावर दरवेळी पक्ष सोडला जातोच, असे नाही. 10व्या सूचीनुसार विचार करता दोन गट आहेतच, अशी महत्वपूर्ण टिप्पणी सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली होती. तसेच 21 जूनलाच पक्षात दोन गट पडल्याचे म्हटले आहे.

एका रात्रीत असं काय घडलं ?
राज्यात तीन वर्षांच्या सुखी संसारानंतर एका रात्रीत असं काय घडलं की? ज्यामुळे एकनाथ शिंदे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला. तुम्ही तीन वर्षे काय करत होता? हा प्रश्न राज्यपालांनी विचारायला हवा होता. तसे काहीही झालेले नाही, असे खडे बोल चंद्रचूड यांनी सुनावले आहे. एक राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष आहे. विधिमंडळ पक्षाने एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती केली. ही वस्तुस्थिती आहे. हा वादाचा विषय नाही. तीन पक्षांच्या युतीमध्ये, तिघांपैकी एका पक्षात असंतोष निर्माण झाला आहे. या वस्तुस्थितीकडे ते दुर्लक्ष करु शकत नाहीत. इतर दोघे युतीत ठाम आहेत. तिथे कोणत्याही प्रकारे साइडकिक्स नाहीत. ते जवळजवळ सत्तेवरच आहेत, असे चंद्रचूड यांनी निरीक्षण नोंदवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *