Ram Charan : ‘ऑस्कर’नंतर राम चरणची मोठी झेप; हॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार

 45 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ मार्च । दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या ऑस्करमुळे (Oscars 2023) चर्चेत आहे. राम चरणच्या ब्लॉकबस्टर ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. सिनेविश्वातील मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातदेखील या सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बाजी मारली आहे. आता राम चरण भारतात परतला असून नुकत्याच एका मुलाखतीत त्याने हॉलिवूडच्या (Hollywood) सिनेमात काम करण्याबद्दल भाष्य केलं आहे.

हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी राम चरण सज्ज (Ram Charam Hollywood Debut)
मीडियाला दिलेल्या मुलाखतीत राम चरण म्हणाला की, “हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास मी सज्ज आहे. पण याबद्दल बोलण्याची ही वेळ नाही. सध्या यावर काम सुरु असून लवकरच मी याबद्दल घोषणा करेन. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते”. राम चरणने सिनेमाबद्दल अधिक माहिती दिली नसली तरी तो हॉलिवूडच्या सिनेमात झळकणार असल्याने त्याचे चाहते आनंदी असून ते आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *