26 total views
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ मार्च । जेव्हा माझ्यावर विश्वास ठेवाल तेव्हा मी राज्यघटनेवर विश्वास ठेवीन. मी भारतीय नाही, मी पंजाबी आहे. पूर्वी पंजाबचे राज्य असलेले संपूर्ण क्षेत्र आम्हाला हवे आहे. आधी ते भारताकडून घेऊ आणि नंतर पाकिस्तानात जाऊ, असे अमृतपाल सिंगने म्हणतो.
अमृतपाल सिंगला खलिस्तानी नेता जर्नेल सिंग भिंद्रनवाले 2.0 म्हटले जात आहे. तर काहींचा दावा आहे की ते हेतुपुरस्सर त्याला पुढे आणण्यात आले आहे.
भारतापासून वेगळे होऊन शीख धर्माच्या लोकांसाठी खलिस्तान निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा 29 वर्षीय अमृतपाल सिंग खालसा सहा महिन्यांपूर्वी पूर्ण शीखही नव्हता.खलिस्तानची मागणी करणाऱ्या ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचा अमृतपाल सिंग प्रमुख आहे. त्याच्या इतर मागण्यांमध्ये अमली पदार्थमुक्त पंजाब आणि शीख सार्वभौमत्व यांचाही समावेश आहे.
अमृतपाल सिंगने 23 फेब्रुवारी रोजी हजारो शिखांसह, अजनाळा तुरुंगातील लवप्रीत ‘तुफान’ याला सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यावर धडक दिली होती. त्यानंतर तो चर्चेत आला होता.10 दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचे सरकार खलिस्तान चळवळ उखडून टाकेल असे म्हटले होते. यावर अमृतपाल सिंगने 2006 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत खलिस्तानच्या बाजूने शांततेने बोलणे हा गुन्हा नाही असे म्हटले होते.
अमित शाह जे म्हणाले होते तेच इंदिरा गांधींनी सांगितले होते आणि त्याचा परिणाम त्यांच्यासाठीही तसाच होऊ शकतो, असे अमृतपालने म्हटले होते. अमृतपाल सिंह यांनी अमित शहांना हिंदु राष्ट्राची मागणी करणाऱ्यांना हेच सांगण्यास सांगितले होते.