अमृतपालचा शोध तिसऱ्या दिवशीही सुरूच, जालंधरमध्ये लपल्याचा पोलिसांना संशय, काका व चालकाने केले सरेंडर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० मार्च । पंजाबमध्ये सोमवारी तिसऱ्या दिवशीही ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगचा शोध सुरू आहे. अमृतपाल जालंधरमध्ये लपल्याचा पोलिसांना संशय आहे. जिल्ह्यातील सर्व एन्ट्री आणि बाहेर जाण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. अमृतपालच्या जल्लुखेडा गावातही पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. पंजाबच्या जम्मू-काश्मीर आणि हिमाचलच्या सीमा देखील सील करण्यात आल्या आहेत.

रविवारी रात्री उशिरा अमृतपालसिंगचे काका आणि त्याच्या ड्रायव्हरने पोलिसांसमोर आत्मसमर्णण केले. अमृतपाल वापरत असलेल्या पांढऱ्या मर्सिडीज देखील जप्त करण्यात आली. आतापर्यंत 114 जणांना अटक करण्यात आली आहे. अमृतपालच्या 4 साथीदारांना आसाममधील दिब्रुगड येथे नेण्यात आले आहे. यामध्ये त्याचा फायनान्सर दलजीत सिंग कलासीचाही समावेश आहे.

‘वारिस पंजाब दे’चे कायदेशीर सल्लागार इमानसिंग खारा यांनी रविवारी उच्च न्यायालयात अमृतपालला न्यायालयात हजर करण्यासाठी अपील केले. न्यायमूर्ती एन. एस. शिखावत यांच्या निवासस्थानी झालेल्या सुनावणीनंतर पंजाब सरकारकडून 21 मार्चपर्यंत उत्तर मागविण्यात आले आहे.

 

पंजाब रोडवेज आणि पनबसच्या बस बुधवारीही धावणार नाहीत. पंजाबमध्ये आज दुपारपर्यंत मोबाईल इंटरनेट आणि बल्क एसएमएस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
पंजाब सरकार केंद्राकडून आणखी 20 आर्मी तुकड्यांची मागणी करू शकते. एनआयएनेही या प्रकरणावर लक्ष ठेवले आहे.
अमृतपालचा आयएसआयशी संबंध जोडण्यासोबतच त्याला परदेशातूनही निधी मिळत असल्याचा संशय आहे. या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) एंट्री कधीही होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *