IPL 2023 : ‘धोनीचे शेवटचे वर्ष…’ माहीच्या निवृत्तीवर दीपक चहरचा मोठा खुलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० मार्च । इंडियन सुपर लीगचा 16वा हंगामाला सुरू होण्यासाठी अवघे 11 दिवस राहिल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीग मध्ये एमएस धोनीच्या भवितव्याबद्दल गेल्या काही काळापासून अफवा पसरल्या आहेत. धोनीने पुष्टी केली की तो या वर्षीच्या स्पर्धेत चेन्नईतील घरच्या प्रेक्षकांसमोर नक्कीच खेळेल.

चेन्नई सुपर किंग्जमधील त्याच्या भविष्याबाबत कोणतीही ठोस बातमी नाही. सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला नुकतेच या विषयावर विचारण्यात आले आणि त्याने मोठा खुलासा केला आहे.

सीएसकेचा स्टार खेळाडू दीपक चहरने धोनीच्या निवृत्तीबाबत मोठा अपडेट दिला आहे. चहरने आपल्या एका मुलाखतीत सांगितले की, कोणीही असे म्हटले नाही की धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम आहे. त्यांनी स्वतः असे सांगितले नाही किंवा आम्हाला असे काही माहित नाही. त्याने संघासाठी जास्तीत जास्त खेळावे अशी आमची इच्छा आहे.

दीपक चहर पुढे म्हणाला, धोनीला माहित आहे की त्याला कधी निवृत्ती घ्यायची आहे. जेव्हा त्याने कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा संपूर्ण जगाने त्याला पाहिले आहे. निवृत्तीचा निर्णय फक्त त्याच्यावर आहे आणि कोणालाच माहीत नाही. मला आशा आहे की तो आता आयपीएलमध्ये अधिक खेळेल. त्याच्या कर्णधारपदाखाली खेळणे हा माझ्यासाठी बहुमान आहे. त्याच्यासोबत खेळणे हे स्वप्न होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *