१० सेकंदात अननस कापण्यासाठी पठ्ठ्याने लढवली शक्कल; Video

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० मार्च । इंटरनेटवर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या हॅक व्हायरल होत असतात. त्यातील काही अगदीच अतिशयोक्ती वाटतात तर काही मात्र नीट वापरून पाहिल्या तर आपली अनेक कामं सोपी करू शकतात. अशीच एक अननस कापण्याची हॅक सध्या ट्रेंड होत आहे. अनेकदा असं होतं की तुम्हाला छान फ्रेश अननस बाजारात दिसतो, तुम्ही विकत घेतानाचा दुकानदाराकडून कापून घेता (त्याने दिला तर बरा) पण अख्खा अननस एका झटक्यात संपणं शक्य होत नाही. अनेकदा फ्रिजमध्ये पडून त्या अननसाचे कापलेले तुकडे काळपट होतात. यापेक्षा तुम्ही फक्त अननस घरी आणून स्वतःच कापला तर? कष्टाचं काम वाटतंय ना, पण या एका सोप्या ट्रिकने तुमचे कष्ट झटक्यात कमी होतील. चला तर पाहूया…

तुम्हाला एक छान धारदार चाकू लागेल आणि मग या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ट्रिक वापरून तुम्हीही सहज अननस कापू शकाल. एकदा का अननस कापला की मग तो स्नॅकिंगसाठी, गार्निशिंगसाठी किंवा अगदी फ्रेश पिना कोलाडा बनवण्यासाठी हवा तसा वापरू शकता.

https://www.instagram.com/foodiechina888/?utm_source=ig_embed&ig_rid=f1376692-5c23-43a9-85c3-750b563688ac

 

https://www.instagram.com/foodiechina888/?utm_source=ig_embed&ig_rid=f1376692-5c23-43a9-85c3-750b563688ac

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *