बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमध्ये अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २० मार्च । मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक केली आहे. गेल्या ७ वर्षांपासून हा अनिल जयसिंघानी हा फरार होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृत फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. जयसिंघानी याच्या इशाऱ्यावरून त्याची मुलगी अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अनिक्षालाही अटक केलेली आहे. या सर्व प्रकरणावर मुंबई पोलिसांकडून दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.

अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. अनिल जयसिंघानी हा कुख्यात क्रिकेट बुकी असून गेल्या ७ वर्षांपासून वॉन्टेड आहे. आणि ५ राज्यांमध्ये त्याच्यावर १७ हून अधिक गुन्हे दाखल आहे. हा मोठा गुन्हेगार असून त्याच्याविरोधा लुकआउट सर्क्युलरही काढण्यात आलं आहे. आणि तरीही तो पोलिसांच्या हाती येत नव्हता. पण मुंबई पोलिसांना त्याला पकडण्यात यश आलं असून त्याला अटक करण्यात आली आहे.

अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा हिला अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न आणि खंडणी मागितल्याचा आरोपावरून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अनिल जयसिंघानी याचा शोध सुरू केला. मुलीला अटक झाल्यानंतर तो व्हॉट्सअॅपवरून एकूणएक अपडेट मिळवत होता. आणि वायफाय डोंगल वापरून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होता. पण पोलिसांनी तांत्रिक मदत घेत त्याला गुजरातमध्ये पकडलं आहे. आता अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न आणि खंडणी मागितल्या प्रकरणात नेमकं सत्य आता यामुळे समोर येणार आहे. या सर्वप्रकरणामागे अनिल जयसिंघानीचा हात असावा, असं बोललं जातंय. कारण तो आपल्यावरील सर्व गुन्हे हटवण्यासाठी प्रयत्न करत होता. आणि त्याच प्रयत्नात अनिल जयसिंघानी हा उपमुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचला होता, असं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *