गुढीपाडव्यासाठी शहरातील सराफा बाजार सज्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मार्च । साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि हिंदू नववर्षाची सुरुवात असलेल्या गुढीपाडव्यासाठी शहरातील सराफा बाजार सज्ज झाला आहे. सोने खरेदीसाठी आलेल्या पुणेकरांसाठी घडणावळीवर आकर्षक सूट देण्यासह विविध भेटवस्तूंच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सोने खरेदीवर तेवढीच चांदी फ्री , लकी ड्रॉ कूपन, मजुरीवर सूट, पैठणी साडीसह आकर्षक भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. लग्नसराईच्या अनुषंगाने तयार दागिन्यांसह वेढणी, कॉइन तसेच बिस्किटांमध्ये चांगली उलाढाल होण्याची अपेक्षा सराफा व्यावसायिकांना आहे.


गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागरिक आवर्जून सोने खरेदी करतात. या वेळी ज्येष्ठांचा चोख सोने, तर तरुणाईचा कमी वजनाचे, हिर्‍याचे दागिने खरेदी करण्याकडे कल राहतो.मात्र, सोने हे सुरक्षित गुंतवणूक तसेच चांगले रिटर्न देत असल्याने सोने महागले तरी नागरिक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करीत असतात. यंदाही नागरिक मुहूर्त साधतील, अशी अपेक्षा सराफा बाजारातून व्यक्त केली जात आहे .

असे आहेत सोन्या-चांदीचे दर
24 कॅरेट (प्रतितोळा) …….. 59 हजार 500 रुपये
22 कॅरेट (प्रतितोळा) …….. 56 हजार 840 रुपये
चांदी (1 किलो) …….. 70 हजार रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *