महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – संभाजीनगर – संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणखी ३५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १३९७ झाली आहे.
संभाजीनगर मधील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्यात ३५ नवीन बाधितांची भर पडली आहे. त्यामुळं आता एकूण रुग्णांची संख्या १३९७ झाली आहे. नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये बायजीपुरा येथील १, मिसारवाडी १, वाळूज महानगर १, बजाजनगर १, संजयनगर १, शहागंज १, हुसेन कॉलनी १, कैलास नगर १, रोकडिया हनुमान कॉलनी २, उस्मानपुरा १, इटखेडा १, एन-४ येथे ३, नारळीबाग २, हमालवाडी ४, रेल्वे स्टेशन परिसर २, सिटीचौक परिसर १, नाथ नगर १, बालाजी नगर १, साई नगर, एन-सहा १, संभाजी कॉलनी, एन-सहा २, करीम कॉलनी, रोशन गेट १, अंगुरी बाग १, तानाजी चौक, बालाजी नगर १, एन-११, हडको १, जयभवानीनगर २ आदी भागातील रहिवाशांचा समावेश आहे. यामध्ये १४ महिला व २१ पुरुषांचा समावेश आहे.