महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मार्च । राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. अनेक ठिकाणी कापणीला आलेलं पिकं खराब झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवाल दिल झाला आहे. जसा अवकाळीचा फटका नांदेड, धाराशीव, छ. संभाजीनगर, नाशिक या जिल्ह्यांना बसला आहे. तसाच फटका पुणे जिल्ह्यात ही बसला आहे. या अवकाळी पावसामुळे पुण्यातील मार्केट यार्डमध्ये भाजीपाला आणि फळांची आवक कमी झाली आहे. मार्केटमध्ये नेहमी भाजीपाला आणि फळांच्या 1500 पेक्षा जास्त गाड्या येत असतात. आज मात्र 50 टक्के आवक कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळात आहे. खेड, आंबेगाव, मावळ, शिरूर आणि पुरंदर भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला आणि फळांचे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम मार्केट यार्डच्या आवकवर झाला आहे.