महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ मार्च । राज्यात मोठ्या उत्साहात मराठी नववर्ष म्हणजेच गुढी पाडव्याचा सण आज (दि.२२) साजरा केला जात आहे. आजच मनेसाचा गुढी पाडवा मेळावा देखील होणार आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरून भाषण करणार आहेत. या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान या भाषणाबद्दलची उत्सुकचा शिगेला पोहचली असतानाच मनसेकडून सेनाभवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
राज ठाकरे काय बोलणार…
मुंबईत आज संध्याकाळी मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यातील राजकीय परिस्थितीवर काय भाष्य करतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्याचा टीझर देखील मनसेकडून (MNS) जारी करण्यात आला होता.
टीझरमध्ये काय आहे?
या टीझरमध्ये गेल्या दोन वर्षातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे. यामध्ये आवाहन करण्यात आलंय की, “महाराष्ट्राच्या मनातील खदखद व्यक्त करणाऱ्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी… चला शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा, २२ मार्च २०२३ सायं. ६ वा, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई”
४० सेकंदाच्या या टिझरमध्ये सुरुवातीला विधानभवनाच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या आवाजात एक ऑडिओ सुरु आहे. या ऑडितील शब्द अक्षऱात दिसतात, त्यात म्हटलं की, गेले दोन अडीच वर्षे महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ना ही चांगली गोष्ट नाही बरं का…महाराष्ट्रासाठी! असं महाराष्ट्रात कधीही नव्हतं. हेच खरं राजकारणं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे राजकारण नव्हे!