शिवसेना विधानसभेच्या ‘इतक्या’ जागा लढवणार; शिंदे गटाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मार्च । आगमी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 240 जागा तर शिवसेनेला 48 जागा असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं, शिवसेना शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी बावनकुळेंच्या वक्तव्यार प्रतिक्रिया दिल्या. आता जागावाटपाच्या मुद्द्यावर नवनियुक्त शिवसेना संसदीय पक्षाचे मुख्यनेते गजानन किर्तीकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले किर्तीकर?

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये 2019 चा युतीचा फार्मूला लागू होईल, लोकसभेत 22 तर विधानसभेत 126 जागांवर शिवसेना लढेल. सोबतच लोकसभा आणि राज्यसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटात असलेल्या खासदार आणि आमदारांवर व्हिप लागू होणार नसल्याचं गजानन किर्तीकर यांनी लोकमत न्यूज 18 संवाद साधताना म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *