आता दोन मिनिटांत घरीच तयार होईल थंडगार बिअर ; जगातील पहिली बिअर पावडर तयार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मार्च । उन्हाळा सुरू होताच बाजारात बिअरची मागणी वाढते. परंतु बिअरमध्ये अल्कोहोल असते, त्यामुळे तुम्ही ते घेऊन सर्व ठिकाणी पिऊ शकत नाही. काही वेळा दुकानातून घरी येईपर्यंत बिअर गरम होते. पण आता तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण झाले आहे. जर्मनीने आता बिअर पावडर तयार केली आहे. तुम्ही फक्त दोन चमचे पावडर थंड पाण्यात मिसळून थंडगार बिअर तयार करू शकता. यासोबतच हे पर्यावरणासाठीही खूप फायदेशीर आहे. कारण पावडर बिअर बनवताना जास्त कार्बन उत्सर्जन होत नाही.

पहिल्यांदाच अशी बिअर
जर्मन न्यूज वेबसाईट DW मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पूर्व जर्मनीमध्ये बनवलेली ही बिअर पावडर हा अशाप्रकारचा पहिला शोध आहे. म्हणजेच आजपर्यंत कधीही पावडर स्वरूपात बिअर बनवली गेली नाही. ही बिअर पावडर बनवणाऱ्या नोएटसेल ब्रुअरीला यांच्यानुसार वर्षाच्या अखेरीस ही बिअर पावडर बाजारात येईल. यासोबतच ते म्हणतात की बाटलीबंद बिअरच्या निर्यातीमध्ये जेवढे कार्बन उत्सर्जन होते तेवढे जास्त यामध्ये नसेल.

दोन मिनिटांत बिअर तयार
ही बिअर दोन मिनिटांत तयार होईल. बिअर बनवणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे की, तुम्ही ही पावडर खरेदी करून ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा यापासून बीअर बनवू शकता. पावडरचे दोन चमचे बाटलीत किंवा ग्लासमध्ये टाका आणि मिक्स करा बिअर तयार. मात्र, सध्या ते केवळ जर्मनीमध्ये उपलब्ध असल्याने संपूर्ण जगापर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल. तुम्ही भारतात राहात असाल तर तुम्हाला अजून थोडा वेळ थांबावे लागेल, कारण भारतात प्रवेश करण्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *