तापमानवाढीचा चटका ! देशात इतक्या राज्यांमधील जंगले आगीच्या विळख्यात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ मार्च । गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवघ्या १२ दिवसात सुमारे ४२ हजारवेळा जंगलांना आग लागली आहे. भारतीय वनसर्वेक्षणानुसार, भारतातील २३ राज्यातील जंगले वणव्याच्या विळख्यात सापडली आहेत.

सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमान असल्याने वणव्याची संख्या वाढत आहे हे खरे असले तरीही भारतात मानवनिर्मित वणव्यांची संख्यादेखील मोठी आहे. यंदा १३ मार्च या एकाच दिवशी देशात ७७२ आगीच्या घटनांची नोंद झाली. भारतीय वनसर्वेक्षणाने या आगींमागील कारण स्पष्ट करताना यंदा शरद ऋतूतील तापमान दरवेळेपेक्षा अधिक असल्याची नोंद केली आहे. कोरडवाहू जमीन आणि उष्णता यामुळे आगीचे प्रमाण वाढते असे त्यांचे म्हणणे आहे. ओडिशामध्ये सर्वाधिक २०२ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यापाठोपाठ मिझोराममध्ये ११०, छत्तीसगड ६१, मेघालय ५९, मणिपूर ५२, आंध्रप्रदेश ४८, आसाम ४३, तेलंगणा ३३, महाराष्ट्र व मध्यप्रदेश प्रत्येकी २७, नागालँड व झारखंड प्रत्येकी २३, कर्नाटक २०, अरुणाचल प्रदेश १३, पश्चिम बंगाल व तामीळनाडू प्रत्येकी ०८, केरळ ०६, बिहार ०४, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गुजरात, सिक्कीम या राज्यात प्रत्येकी एका ठिकाणी आग लागली आहे.

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातील तानसा अभयारण्यात वणव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती नष्ट झाल्या. फेब्रुवारीच्या अखेरीस कात्रज घाटातही वणवा पेटला. मेळघाट व्याघ्रप्रकल्पातही दररोज वणव्याच्या घटना आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *