……… cm पदाची संधी हुकण्यामागे पवारांचा हात ; सावंतांचा गौप्यस्फोट ; नंतर मात्र ‘ते’ वक्तव्य मी केल्याची अरविंद सावंतांची सारवासारव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३ एप्रिल । ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अरविंद सावंत यांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. शरद पवारांमुळे एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकल्याचा अप्रत्यक्ष दावाच त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला शरद पवारांचा विरोध होता. रिक्षावाल्याचं नेतृत्व कसं मान्य करणार? काँग्रेस राष्ट्रवादीकडे अनेक दिग्गज नेते आहेत, ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावर राहिले आहेत, मग हे सर्व नेते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना म्हटल्याचा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी पवारांनीच उद्धव ठाकरेंना गळ घातल्याचंही सावंत यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल एक मोठा दावा केला होता. पण काही काळातच त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन युटर्न घेतला आहे. रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं पवार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल बोलताना म्हणाले होते, असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं होतं. एका कार्यक्रमात बोलताना अरविंद सावंत यांनी हा दावा केला आहे. मात्र एबीपी माझानं यासंदर्भात बातमी दाखवल्यावर अरविंद सावंत यांनी पूर्णपणे यू-टर्न घेतला. रिक्षावाला शब्द शरद पवारांनी वापरला नाही, तो शब्द माझा आहे. एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार का? असं पवार म्हणाले होते, अशी सारवासारव अरविंद सावंत यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *