CSK vs LSG : आज चेपॉक स्टेडिअमवर धोनी आणि राहुल आमने-सामने

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३ एप्रिल । चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स (CSK vs LSG) यांच्यात 3 एप्रिल (सोमवारी) रोजी रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअम म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल.

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.

IPL 2023 LSG Playing 11 : लखनौ संभाव्य प्लेईंग 11
केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन (विकेटकिपर), कृणाल पंड्या, आयुष बडोनी, आवेश खान, मार्क वुड, रवी बिश्नोई, डॅनियल सन्स

IPL 2023, CSK Playing 11 : चेन्नई संभाव्य प्लेईंग 11
डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), मिचेल सँटनर, दीपक चहर, राजवर्धन हंगरगेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *