…… चंदकांत दादा पाटील ह्यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम नको: सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमानाने साजरी करण्यात येणार्‍या महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात महानगरपालिकेने प्रमुख अतिथी म्हणून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित केले आहे. या प्रकाराने संपूर्ण आंबेडकरी समूहात संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही महिन्यापुर्वीच याच पिंपरी चिंचवड शहरात महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. सदरचे प्रकरण ताजे असतानाच पिंपरी चिंचवड महानगरपालिका चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करून खोडसाळ प्रकार करून जयंती उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रकार करीत आहे. त्याचा आम्ही संपूर्ण आंबेडकरी समाज पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने निषेध करीत आहोत.

 

महोदय आपण सदर प्रकरणात लक्ष घालून चंद्रकांत पाटील यांना सदर कार्यक्रमात उपस्थित राहण्यास मज्जाव करावा अन्यथा आम्ही चंद्रकांत पाटील यांचा लोकशाही मार्गाने सनदशीरपणे विरोध करू यांची नोंद घ्यावी.महात्मा जोतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत व उत्साहात साजरी करण्यास सहकार्य करावे ही नम्र विनंती…

युवा कामगार सेना महाराष्ट्र राज्य ह्यांनी सचिन काळभोर ह्यांच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला असून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त ह्यांना पाठिंबा निवेदन देण्यात आले युवा कामगार संघटनेचे वतीने

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *