मोदींवरील ‘त्या’ विधानावरून फडणवीसांचा राऊतांवर हल्लाबोल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ एप्रिल । शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदींनी लहानपणी चहा विकून स्वत:चं शिक्षण पूर्ण केलं. मग त्यांनी घेतलेली पदवी लपवण्याचं काय कारण. तसेच, पंतप्रधानांनी पदवी मागणाऱ्या केजरीवालांना २५ हजार रुपयांचा दंड लावतात, हा कुठला न्याय आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

नेमकं संजय राऊत काय म्हणाले?
सोमवारी ( ३ मार्च ) संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधानांनी खरे तर स्वत: येऊन खुलासा केला पाहिजे. नव्या संसद भवनाच्या मुख्यद्वारावर ही पदवी लावली पाहिजे. भाजपाच्या बहुतांश नेत्यांची पदवी बोगस आहे. दहा लोकांची नावं घ्या, त्यातील बहुतांश नेत्यांची पदवी बोगस असेल.”


“प्लॅटफॉर्मवर चहा विकून मोदींनी शिक्षण पूर्ण केलं. बीए, एम.एम विथ इंटायर पॉलिटिकल सायन्स… ऐतिहासिक आणि क्रांतिकारी विषयात त्यांनी पदवी घेतली आहे. ही त्यांची पदवी संसदेला समजली पाहिजे. मोदींनी नवी संसद बनवली, तिथे पदवी लावण्यात यावी. त्यात लपवण्यासारखं काय आहे,” असा सवालही संजय राऊतांनी विचारला आहे.

संजय राऊतांच्या विधानानंतर त्यांच्यावर राजकीय स्तरातून टीकास्र डागलं जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. “अलीकडच्या काळात बाजारबुणगेही पंतप्रधान मोदींवर बोलतात. त्या बाजारबुगण्यांना सांगू इच्छितो, सुर्याकडे पाहून थुंकाल, तर थुंकी तुमच्या तोंडावर पडणार आहे. सूर्यावर पडू शकत नाही.”

“त्यामुळे हे राऊत, फाऊद, दाऊद जे असतील यांना सांगतो, मोदींकडे तोंड करून थुंकण्याचा प्रयत्न करू नका. तुमची थुंकी तुमच्याच तोंडावर पडत आहे. त्याच थुंकीने लथपथलेला चेहरा पाहण्याची कोणाची इच्छा नाही,” अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *