Stock markets: आजच्यासह ‘या’ दिवशीही मार्केट बंद राहणार; या शेअर्सला बसणार फटका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ एप्रिल । महावीर जयंतीनिमित्त आज भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहे. बुधवारी नेहमीचा व्यापार पुन्हा सुरू होणार आहे. तसेच, या आठवड्याच्या शेवटी, शुक्रवारी, गुड फ्रायडेसाठी बाजार बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Indian stock markets shut today for Mahavir Jayanti )

मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यात बाजारात 4 दिवस सुट्टी आहे. डिपॉझिटरी डेटानुसार, फेब्रुवारी 2023 पर्यंत भारतात एकूण 11.25 कोटी खाती आहेत. कोरोनानंतर डिमॅट खात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

शेअर मार्केट बंद राहिल्यामुळे, TCS, TATASTEEL, ADANIPORTS, BRITANNIA, CIPLA, BPCL या शेअर्सला मोठा फटका बसणार आहे.

गुंतवणूकदारांना 1.5 लाख कोटी नफा
आज BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 3 एप्रिल रोजी वाढून रु. 259.69 लाख कोटी झाले आहे जे त्यांच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार 31 मार्च रोजी रु. 258.19 लाख कोटी होते.

अशाप्रकारे, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे दीड लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *