महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ एप्रिल । एखाद्या शहरात वाहनांची संख्या जास्त वाढत असेल तर त्या शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेसी नाही, हे स्पष्ट होते. गेल्या काही वर्षांत पुणे शहरातील वाहनांची संख्या वाढत आहे. परंतु रस्ते वाढू शकत नसल्याने वाहतुकीची कोंडी कायम होत असते. आता सन २०२२-२३ या वर्षांत पुणे शहरातील वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुणेकर सार्वजनिक वाहतुकीऐवजी खाजगी वाहनांना पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहनांच्या संख्येत कोणती वाहने पुणेकरांच्या पसंतीस उतरली आहे, जाणून घेऊ या.
शहरातील एकूण वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण ७५ टक्क्यांहून अधिक झाले आहे. मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षातही पुणेकरांचा कल दुचाकी खरेदीकडे असल्याचे स्पष्ट दिसून येतेय. मागील आर्थिक वर्षात दुचाकींची विक्री १ लाख ८५ हजार ६६६ झाली आहे. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे ८५ हजारांनी जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण वाहनांची विक्री १ लाख ७० हजार ५३७ होती. ती २०२२-२३ मध्ये २ लाख ९२ हजार २५९ वर पोहोचली आहे. मागील वर्षभरात वाहन विक्रीत सुमारे १ लाख २० हजारांहून अधिक वाढ झाली आहे. आरटीओ आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये नोंदणी झालेल्या वाहनांची आकडेवारी जाहीर केली आहे.
वाहने वर्षभरात किती वाढली
कोरोनानंतर पुणेकरांनी वाहन खरेदी करण्यावर मोठा जोर दिला आहे. यामुळे या आर्थिक वर्षात पुणे शहरामध्ये तब्बल २ लाख ९२ हजार वाहने वाढलीत आहेत. त्यासोबतच ई-वाहन खरेदीला गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ई-वाहनांची खरेदीसुध्दा तिप्पट झाली आहे. २०२१-२२च्या तुलनेत पुणेकरांकडून २०२२-२३ या आर्थिक वर्षात तब्बल २ लाख ९२ हजार २५८ वाहनांची खरेदी करण्यात आली. म्हणजेच २०२१-२२ या वर्षात १ लाख ७० हजार ५३७ वाहनांची खरेदी करण्यात आली होती.
पसंतीसाठी मोठा खर्च
पुणे शहरातील नागरिकांचा वाहनांच्या आकर्षक क्रमांकाकडे कल वाढत आहे. पुणे शहरातील वाहनांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. मग वाहनांच्या पसंती क्रमांकासाठी लाखो रुपये खर्च पुणेकर करताय. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३६ कोटी २ लाख ६० हजार ५०० रुपये पुणेकरांनी खर्च केले. यापूर्वी २०२१-२२ मध्ये हा खर्च २२ कोटी २१ लाख ५४ हजार रुपये होता. म्हणजे त्यात सुमारे १४ कोटी रुपयांची वाढ झालीय.