ITR Filling : इनकम टॅक्स रिटर्न भरताना या चुका पडतील महागात, अडचणी वाढतील

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ एप्रिल । प्राप्तिकर फाईल (ITR Filing) करण्याचा हंगाम सुरु झाला आहे. इनकम टॅक्स रिटर्न योग पद्धतीने आणि वेळेत जमा करणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 आणि 2023-24 साठी ITR फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. आयटीआर भरण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. पण घाईघाईत आपण काही ना काही चुका करतो. या छोट्या चुका नंतर मोठ्या अडचणी उभ्या करतात. तसेच तुम्हाला भूर्दंड (Penalty) ही भरावा लागू शकतो. त्यामुळे प्राप्तिकर फाईल करताना या चुका टाळणे आवश्यक आहे.

व्यक्तिगत माहिती
आयटीआर भरताना व्यक्तिगत माहिती भरताना काळजीपूर्वक भरा. यामध्ये तुमचे नाव, पॅन, ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक योग्य भरा. यामधील एकही माहिती भरताना चूक झाली तर तुम्हाला आयटीआर प्रक्रिया करताना वेळ लागेल.

आयटीआर फॉर्म चुकीचा नको
आयटीआर फॉर्म निवडताना चुका करु नका. तुमच्या आर्थिक उत्पन्नानुसार फॉर्मची निवड करावी लागते. हा फॉर्म निवडताना काळजी घ्या. योग्य फॉर्म न निवडल्यास तुम्हाला फटका बसू शकतो.

उत्पन्नाचा स्त्रोत
आयटीआर फाईल करताना वेतन, किरायातील उत्पन्न, व्याजातून मिळणारे उत्पन्न, व्यावसायिक उत्पन्न, भांडवलातून कमाई आदी स्त्रोतातून माहिती मिळते. जर तु्म्ही योग्य माहिती न दिल्यास पुढे तुम्हाला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू शकतो.

मानक वजावट
मेडिकल विमा, शिक्षणासाठीचे कर्ज, धर्मादाय देणगी यातून तुम्ही कर वाचवू शकतात. पण हे लाभ तुम्हाला नवीन कर प्रणालीत मिळणार नाहीत. हा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जुनी कर पद्धत निवडावी लागेल .

आयटीआर व्हेरिफाय
आयटीआर व्हेरिफाय करायला विसरु नका. पडताळा केल्याशिवाय आयटीआर फाईल करु नका. तुम्ही आयटीआर रिटर्न इलेक्ट्रॉनिक स्वरुपात वा ITR-V फॉर्मवर एक स्वाक्षरी करुन सीपीसी कॉपी घेऊन आयटीआर दाखल करु शकता. त्यासाठी 120 दिवसांचा वेळ देण्यात येतो.

बँक खात्याची चुकीची माहिती
बँक खात्याचा तपशील देताना त्यात चुका करु नका. बँकेचा खाते क्रमांक, तुमचे संपूर्ण नाव, शाखेची माहिती आणि इतर माहिती भरताना काळजी घ्या.

परदेशात संपत्ती
तुमची इतर कोणत्याही देशात काही संपत्ती असेल. परदेशी बँकेत ठेव असेल अथवा काही व्यवहार केला असेल तर त्याची माहिती आयटीआर भरताना नक्की भरा. ही माहिती लपवल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

वेळेत भरा आयटीआर
आयटीआर भरताना तो वेळेच्या आत भरण्याची काळजी घ्या. त्यामुळे तुमचा वेळ तर वाचेलच, पण मनस्तापही होणार नाही. दंड आणि व्याज यांचा तुम्हाला फटका बसणार नाही. तसेच पुन्हा नव्याने त्यासाठी प्रक्रिया करावी लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *