लोकशाहीच्या चौथ्यास्तंभाच्या मदतीसाठी धावले पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे ,शहरातील वृत्तपत्र विक्रत्यांना   जीवनावश्यक वस्तुंचे कीट वाटप

Spread the love

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- विशेष प्रतिनिधी-  पिंपरी- चिंचवड : कोरोना महामारीच्या संकटात आणि लॉकडाऊनच्या काळात लोकशाहीचा चौथास्तंभ असणारे वृतपत्र नागरिकांच्या घरोघरी वाटप करणा-या विक्रत्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पुढाकार घेतला. पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे २७० विक्रत्यांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप शुक्रवारी करण्यात आले.

कोरोना लॉकडाऊनमुळे कष्टकरी जनतेचे काम थांबले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे वेळ आली होती. मात्र, सर्वसामान्य व कष्टकरी जनतेचे नेतत्व करणा-या आमदार बनसोडे यांनी या सर्वांना संकट काळात मोठा आधार दिला आहे. शहरातील धुणीभांडी करणा-या कष्टकरी महिला, सर्व रिक्षा चालक, असंघटित क्षेत्रातील कष्टकरी वर्गाला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. केवळ लोकप्रतिनिधी म्हणून एसीमध्ये बसण्याऐवजी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून ते रस्त्यावर उतरून गोरगरीबांना मदत करीत आहेत. ऐवढेच नाही, तर शहरातील खासगी डॉक्टरांनाही त्यांनी सुरक्षेसाठी एन-९५ मास्कचे वाटप केले आहे.

वृत्तपत्र विक्रता हा या कष्टकरी जनतेमधील महत्त्वाचा घटक आहे. वर्षभर थंडी, वारा व पाऊस यांची कोणतीही चिंता न बाळगता नागरिकांच्या घरोघरी पहाटे वृतपत्र वाटप करणाचे काम विक्रते करतात. वृत्तपत्राच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम केले जाते. त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी पुढाकार घेतला.  शहरातील सुमारे २७० विक्रत्यांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप केले. तसेच, सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सुरक्षेसाठी एन-९५ मास्कचे वाटप करण्याचेआश्वासन त्यांनी दिले आहे.


यावेळी शहरातील विविध वृतपत्राचे पत्रकार, वितरण प्रतिनिधी, पुणे व पिंपरी-चिंचवड वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता पिसे, विश्वस्त प्रवीण माने, राजकुमार ढमाले, वसंत घोटकुले, जितेंद्र मोरे, गोरख फुलसंदर, तसेच शहरातील सर्व केंद्रांचे विभागप्रमुख कृष्णकांत कांबळी, मनोज काकडे, अनिल नामदे, औदुंबर कळसाईत, संतोष आंब्रे, देविदास शेळके, प्रशांत पाटील, विश्वास फपाळे, शंकर हरपुडे, कांचन गायकवाड, उद्धव जाधव, प्रशांत साळुंखे आदी उपस्थित होते.
—————–

‘‘वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथास्तंभ आहे. कोरोनाच्या संकटातही नागरिकांपर्यंत अचूक माहिती देऊन जनजागृती करणा-या वृत्तपत्रांच्या विक्रत्यांना जीवनावश्यक वस्तुंची मदत करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. यापुढील काळातही वृत्तपत्र विक्रत्यांच्या मदतीसाठी व अडचणी सोडविण्यासाठी मी पुढाकार घेईन.’’
– अण्णा बनसोडे, आमदार, पिंपरी मतदारसंघ.
————-

गोरगरीबांची जाण असलेले नेतृत्त्व : विजय पारगे

पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे सर्वसामान्य व गोरगरीब, कष्टकरी जनतेच्या अडीअचडणी व समस्यांची जाण असणारे नेतृत्त्व आहे. वृत्तपत्र विक्रत्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करून त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांनी घेतलेला पुढाकार पाहून इतर लोकप्रतिनिधींना ही मदत करण्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल.
– विजय पारगे, अध्यक्ष, पुणे व पिंपरी-चिंचवड वृत्तपत्र संघटना
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *