वाहतुकीचे नियम पाळा ; पुण्यातून वर्षभरात इतक्या कोटींचा झाला दंड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ एप्रिल । रस्त्याच्या चुकीच्या बाजूने (Wrong side) आणि एकेरी वाहन चालवणे, नो-एंट्री झोनमध्ये दुचाकी चालवणारे दुचाकीस्वार वाहनचालकांची संख्या पुणे शहरात वाढत आहे. वाहतूक पोलिसांच्या नोंदींमधून (Traffic police Report) ही बाब समोर आली आहे. वाहतूक पोलिसांप्रमाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही (आरटीओ) वाहन धारकांवर कारवाई केली जात आहे. नियम तोडणाऱ्यांना दंड होतो, मेमो दिला गेला आहे. यामुळे हजारो पुणेकरांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांची वसुली झाली आहे. यामुळे नियम पाळा, अन्यथा दंडाला समोरे जाण्यासाठी तयार रहा, असा संकेतच पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने या कारवाईच्या माध्यमातून दिला आहे.

किती जणांवर झाली कारवाई

पुणे शहरात गेल्या वर्षभरात वीस हजार वाहनांवर आरटीओची कारवाई केली आहे. नियम न पाळणाऱ्या बेकायदेशीर वाहनांवर आरटीओ कडून दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईच्या माध्यमातून वर्षभरात शहरात १५ कोटी रुपयांच्या दंडाची वसुली झाली आहे. पुणे शहर आरटीओकडून शहरात वायुवेग पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने ही कारवाई केली आहे. पुणे शहरातच नाही तर पुणे शहराच्या बाहेरील मार्गावर वायुवेग पथकाची करडी नजर आहे. यामुळेच वायुवेग पथकाकडून वर्षभरात वीस हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर
पुणे शहरात वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरु झाली आहे. शहरातील चौका- चौकात पुणे वाहतूक पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. अगदी पुणे शहर वाहतूक पोलीस आयुक्त देखील ॲक्टीव्ह मोडवर आले आहेत. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत पुणे शहरात 795 जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्या प्रत्येकावर वाहतूक पोलिसांची नजर असणार आहे. वाहतूक पोलिसांच्या रडावर पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी, वकील आणि पत्रकार देखील आले आहेत. त्यांच्यांकडूनही वाहतूक पोलिसांनी दंड वसूल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *