महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – संभाजीनगर : जिल्ह्यात आज सकाळी 42 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1540 झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी ३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १४९८ वर पोहोचली आहे. नव्याने आढळलेला रुग्ण हडकोतील मुझफ्फरनगरमधील आहे. शुक्रवारी शहरात ५२ रुग्ण आढळले होते. शनिवारी एकही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात आजवर ९६७ रुग्ण बरे झाले आहेत.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : भवानी नगर, जुना मोंढा (4), कैलास नगर, गल्ली नं. दोन (3), एन सहा, सिडको (3), जाफर गेट, जुना मोंढा (1), गल्ली नं.17, संजय नगर, मुकुंदवाडी (1), गल्ली नं. चार रहीम नगर, जसवंतपुरा (1), व्यंकटेश नगर, जालना रोड (1), समता नगर (1), नवीन बायजीपुरा (1), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (1),किराडपुरा (3), पिसादेवी रोड (1), बजाज नगर (1), देवळाई परिसर (1), नाथ नगर (1), बालाजी नगर (1), हमालवाडी (1), जुना बाजार (2), भोईवाडा (1), मनजित नगर, आकाशवाणी परिसर (2), सुराणा नगर (1), अझम कॉलनी (1), सादात नगर (1), महेमुदपुरा, हडको (1), निझामगंज कॉलनी (1), शहागंज (1), गल्ली नं. 24 संजय नगर (1), बीड बायपास रोड (1), स्वप्न नगरी (1), अन्य (2) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 24 महिला आणि 18 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
