Ruturaj Gaikwad in IPL : पुण्याच्या ऋतुराज गायकवाडचा IPL मध्ये दंगा ! पाडला षटकारांचा पाऊस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० एप्रिल । Ruturaj Gaikwad Record in IPL : इंडियन प्रीमियर लीगचं (Indian Premier League) यंदाचा 16 वा मोसम सुरु आहे. आयपीएलमध्ये (IPL) अनेक दिग्गज तसेच नवख्या खेळाडूंनी अनोखे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यातीलच एक खेळाडू म्हणजे मराठमोळा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad). आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाडने चांगली कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलमध्ये अक्षरक्ष: षटकारांचा पाऊस पाडला आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही दिग्गज खेळाडूंना मागे टाकत ऋतुराज गायकवाड आघाडीवर आहे.

ऋतुराज गायकवाडने आयपीएलच्या इतिहासात उत्तुंग षटकार ठोकले आहेत. यंदाच्या मोसमात म्हणजे आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) ऋतुराज चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ऋतुराजने तीन सामन्यांमध्ये दमदार खेळी करत 14 षटकार ठोकले आहेत. गेल्या मोसमात आयपील 2022 मध्ये 14 सामन्यात त्याने 14 षटकार ठोकले होते. तर त्याआधीच्या आयपीएल 2021 मध्ये ऋतुराजने 16 सामन्यांमध्ये 23 षटकार ठोकले होते. इतकंच नाही तर आयपीएल 2021 मध्ये ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.

आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाडकडून षटकारांचा पाऊस

आयपीएल 2023 : 14 षटकार, 3 सामने

आयपीएल 2022 : 14 षटकार, 14 सामने

आयपीएल 2021 : 23 षटकार, 16 सामने

ऋतुराजची सलग दोन अर्धशतकं
मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये विस्फोटक फलंदाजी केली आहे. त्याने सलग दोन सामन्यात अर्धशतक झळकावलं तर, तिसऱ्या सामन्यात नाबाद 40 धावांची खेळी केली. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad in IPL) याने विस्फोटक फलंदाजी केली होती. गुजरातविरोधात ऋतुराजने 92 धावांचा पाऊस पाडला होता. त्यानंतर लखनौविरोधात त्याने अर्धशतकी खेळी केली. प्रत्येक हंगामानंतर ऋतुराज गायकवाड याची फलंदाजी अधिक धमाकेदार होत असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *