महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० एप्रिल । काही रेल्वे शॉर्ट टर्मिनेशन, शॉर्ट ओरिजिनेटेड, तर काही वळवण्यात आल्या आहेत. 7 ते 12 एप्रिल दरम्यान हावडा मार्गे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत. हावडा-मुंबई, हावडा- पुणे, हावडा- चेन्नई, हावडा-अहमदाबाद मेल, एक्स्प्रेस, गितांजली, समरसता अशा विविध गाड्या 7 एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांनी आखलेले नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. आंदोलकांनी रेल्वे रुळाची प्रचंड हानी केल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे. रेल्वे रुळाचे काम पूर्वपदावर आणण्यासाठी किमान पाच दिवस लागणार आहे. त्यामुळे 12 एप्रिलपर्यंत हावडाहून येणाऱ्या सर्व प्रकारच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.कोटशिला जंक्शन आणि खेमसुली रेल्वे स्थानक आंदोलकांनी लक्ष्य केले होते.
सदर परिसरातील ट्रॅक उखडून टाकले आहे. रुळाला प्रचंड क्षती पोहोचली असून, दुरुस्तीचे कार्य युद्धस्तरावर प्रारंभ झाल्याची माहिती आहे. एकंदर परिस्थिती पाहता आता गोंदिया स्थानकावर पैसे रिटर्न घेण्यासाठी प्रवासानी गर्दी केली आहे.