महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० एप्रिल । बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी अशी ओळख असणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) हा आपल्या हटके शैलीनं प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. गेल्या काही दिवसांपासून अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर बॅक टू बॅक फ्लॉप ठरत आहेत आहेत.अक्षय हा सध्या ‘द एंटरटेनर्स’ या कार्यक्रमानिमित्त जागभरात दौरा करत आहे. नुकताच हा कार्यक्रम अमेरिकेत पार पडला. या कार्यक्रमात सोनम बाजवा आणि मौनी रॉय (Mouni Roy) यांच्यासोबत स्टेजवर शर्टलेस डान्स केल्यानं सध्या अक्षयला नेटकरी ट्रोल करत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार हा मौनी रॉय आणि सोनम बाजवासोबत स्टेजवर शर्टलेस डान्स करताना दिसत आहे.व्हिडीओमध्ये अक्षय हा त्याच्या 2012 मध्ये रिलीज झालेल्या ‘खिलाडी 786’ चित्रपटातील ‘बलमा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अक्षयला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
It looks so cringe to see 59 yo shirtless uncle dancing with 23- 24yo girls and doing creepy steps just to stay relevant.
What a downfall for Akshay Kumar.pic.twitter.com/DXzdPs0ZQ2
— Dr Nimo Yadav (@niiravmodi) April 8, 2023
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
अक्षयच्या व्हायरल व्हिडीओ शेअर करुन एका नेटकऱ्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ’59 वर्षाचा काका शर्टलेस होऊन 23- 24 वर्षांच्या मुलींसोबत नाचताना पाहून खूप वाईट वाटत आहे.’ या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘काका, थोडी तरी मर्यादा बाळगा.’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘ही भारतीय संस्कृती नाही, ही कॅनडाची संस्कृती आहे.’