नोकरीतून निवृत्त झाल्यावर ६० व्या वर्षी सुरू केला व्यवसाय ; आज वयाच्या ९२ व्या वर्षी २० हजार कोटींच्या कंपनीचे मालक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० एप्रिल । दिग्गज उद्योगपतींच्या संघर्षाच्या आणि यशाच्या अनेक कहाण्या देशात ऐकायला मिळतात. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अनेक व्यावसायिकांनाही त्यासाठी मोठी कसरत करावी लागलेली आहे. आम्हीसुद्धा तुम्हाला अशाच एका व्यावसायिकाची कहाणी सांगत आहोत, ज्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी व्यवसाय सुरू केला अन् ते आज आज २०,००० कोटींच्या कंपनीचा मालक आहेत. ज्या वयात लोक निवृत्त झाले, त्याच वयात लक्ष्मण दास मित्तल यांनी व्यवसाय करायला सुरुवात केली हे ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटेल पण ते खरं आहे. ते सोनालिका समूहाचे अध्यक्ष आहेत, जे भारतातील तिसरे सर्वात मोठे ट्रॅक्टर उत्पादक आहेत. वयाच्या ९२ व्या वर्षी लक्ष्मण दास मित्तल हे भारतातील दुसरे सर्वात वयस्कर अब्जाधीश आहेत.

एलआयसी एजंटपासून बिझनेस टायकून बनण्याची कहाणी
विशेष म्हणजे लक्ष्मण दास मित्तल हे एकेकाळी एलआयसी एजंट होते, ज्यांनी आपला व्यवसाय उभारण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. यासाठी लक्ष्मण दास मित्तल यांनी वयाच्या ६०व्या वर्षी व्यवसाय सुरू केला आणि १९९६ मध्ये ट्रॅक्टर उत्पादनात प्रवेश केला आणि सोनालिका ट्रॅक्टर्सची स्थापना केली. साधारणपणे वयाच्या ६० व्या वर्षी लोकांना निवृत्त होऊन आनंदी आणि शांत जीवन जगायला आवडते, परंतु लक्ष्मण दास मित्तल यांनी या वयातही काम करणे आणि संघर्ष करणे सोडले नाही.

पगारातून पैसे वाचवून व्यवसाय सुरू केला
१९५५ मध्ये लक्ष्मण दास मित्तल एलआयसी एजंट म्हणून काम करू लागले. तेव्हापासून त्यांनी पगारातून काही पैसे वाचवायला सुरुवात केली. लक्ष्मण दास मित्तल यांनी आपली सर्व बचत कृषी यंत्रांशी संबंधित साइड बिझनेस सुरू करण्यासाठी वापरली, परंतु लक्ष्मण दास मित्तल दिवाळखोरीत गेले. तरीही त्यांनी हार मानली नाही आणि काही वर्षे संघर्ष केल्यानंतर त्यांनी यशाची चव चाखली. लक्ष्मण दास मित्तल यांनाही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात प्रतिष्ठित उद्योगरत्न पुरस्काराचा समावेश आहे.

वयाच्या ९२ व्या वर्षीही सक्रिय
लक्ष्मण दास मित्तल यांच्या ट्रॅक्टर कंपनीचा उत्तर भारतीय राज्यांमध्ये मजबूत व्यवसाय आहे. सोनालिका ट्रॅक्टर हे पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांची पसंती आहे. वयाच्या ९२ व्या वर्षीही लक्ष्मणदास मित्तल कंपनीचे कामकाज पाहतात. याशिवाय लक्ष्मणदास मित्तल त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सोनालिका इम्प्लिमेंट्स सांभाळतात. सोनालिका इम्प्लिमेंट्स पेरणी यंत्र आणि गव्हाचे थ्रेशर बनवते. सोनालिका ट्रॅक्टर्सचा पंजाबमधील होशियारपूर येथे एक मोठा उत्पादन कारखाना आहे. सोनालिका ग्रुपचे पाच वेगवेगळ्या देशांमध्ये ५ प्लांट आहेत. कंपनी १२० हून अधिक देशांमध्ये ट्रॅक्टर निर्यात करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *