Gold Price: आता यापुढे घरात इतकेच सोने ठेवू शकाल, अन्यथा… ; सरकारचा मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ११ एप्रिल । सोने खरेदीला महिला जास्त प्राधान्य देत असतात. तसेच अनेक जण सोने खरेदीसाठी प्राधान्य देताना त्याकडे एक गुंतवणूक म्हणून पाहत असतात. मात्र, ही गुंतवणूक तुम्हाला भारी पडू शकते. दरम्यान, सोने हा एक मौल्यवान धातू आहे ज्याचे मूल्य कालांतराने वाढत आहे. सध्या सोने दर 10 ग्रॅम अर्थात एक तोळा 60,000 रुपयांच्या घरात आहे. भविष्यात सोने किंमत ही लाखाच्या घरात पोहोण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याला अनेकजण प्राधान्य देत आहेत. परंतु तीन वर्षांहून अधिक काळ सोने ठेवल्यानंतर जर एखाद्याने सोने विक्री केली, तर विक्रीच्या रकमेवर दीर्घकालीन भांडवली नफा कर (LTCG) आकारला जाईल, जो इंडेक्सेशन बेनिफिटसह 20 टक्के असेल. दुसरीकडे, जर तुम्ही खरेदी केल्यापासून तीन वर्षांच्या आत सोने विकले, तर नफा व्यक्तीच्या उत्पन्नात जोडला जातो आणि लागू कर स्लॅबनुसार कर आकारला जातो.

या सोने खरेदीवर कर नाही!
आता यापुढे Gold वर कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनुसार (CBDT), जर एखाद्या व्यक्तीने उत्पन्न उघड केले असेल, कृषी उत्पन्नासारखे सवलत दिलेले उत्पन्न असेल किंवा पात्र घरगुती बचत किंवा कायदेशीररित्या वारसा मिळालेल्या उत्पन्नातून सोने खरेदी केले असेल तर ते कराच्या अधीन नाही. नियमांमध्ये असेही म्हटले आहे की शोध मोहिमेदरम्यान, अधिकारी घरातून सोने दागिने किंवा दागिने जप्त करु शकत नाहीत, जर ते प्रमाण विहित मर्यादेत असेल.

सरकारच्या निमयानुसार इतके सोने घरी ठेवू शकता?
अनेक जण सोने खरेदी करतात आणि दागिण्याच्या स्वरुपात ते वापरत असतात. मात्र, आता घरात सोने ठेवण्यावर सरकारने मर्यादा आणल्या आहेत. सरकारी नियमांनुसार विवाहित महिला 500 ग्रॅम सोने ठेवू शकते, अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने ठेवू शकते आणि कुटुंबातील पुरुष सदस्यांसाठी ही मर्यादा 100 ग्रॅम आहे. नियमांमध्ये असे म्हटले आहे की, ‘याशिवाय, कोणत्याही मर्यादेपर्यंत दागिने कायदेशीररित्या ठेवणे पूर्णपणे सुरक्षित आहे.’ याचा अर्थ असा की, सोने साठवणुकीला कोणतीही मर्यादा नाही, जोपर्यंत ते उत्पन्नाच्या स्पष्ट स्त्रोतांमधून खरेदी केले गेले आहे.

Gold विक्रीवर आता कर
दुसरीकडे, जर एखाद्याने सोने तीन वर्षांपेक्षा जास्त काळ स्वत:कडे ठेवल्यानंतर त्याची विक्री केली, तर विक्रीतून मिळणाऱ्या रकमेवर दीर्घकालीन भांडवली नफा कर (LTCG) लावला जाईल, जो इंडेक्सेशन बेनिफिटसह 20 टक्के आहे. दुसरीकडे, तुम्ही खरेदी केल्यापासून तीन वर्षांच्या आत सोने विकल्यास, नफा व्यक्तीच्या उत्पन्नात जोडला जातो आणि लागू कर स्लॅबनुसार कर आकारला जातो.

गोल्ड बाँड्स
केंद्र सरकारने सोने खरेदीसाठी नव्याने गोल्ड बाँड्स आणले आहेत. त्यानुसार अनेक जण गोल्ड बाँड्स खरेदी करण्यावर भर देत आहेत. गोल्ड बाँड्स (SGB) विकण्याच्याबाबतीत, नफा तुमच्या उत्पन्नात जोडला जाईल आणि नंतर निवडलेल्या कर स्लॅबनुसार कर आकारला जाईल. जेव्हा तीन वर्षांच्या होल्डिंगनंतर SGBs विकले जातात, तेव्हा नफ्यावर इंडेक्सेशनसह 20 टक्के आणि इंडेक्सेशनशिवाय 10 टक्के कर आकारला जाईल. विशेषत: बॉण्ड मॅच्युरिटीपर्यंत ठेवल्यास, नफ्यावर कोणताही कर लावला जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *