Spiritual Tips : मन एकाग्रच होत नाही. मग ध्यान कसं करणार? या टिप्स ट्राय करा, नक्की फरक दिसेल…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ११ एप्रिल । How To Concentrate In Meditation : अनेक मानसिक, शारीरिक आजारांवर उपचार म्हणून ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. अनेकांना तो पाळायचाही असतो. पण नेमकं ध्यानाला बसायचं म्हटलं की, डोळे मिटल्यावर नको नको ते सगळे विचार डोक्यात गर्दी करतात. मन एकाग्रच होत नाही. मग ध्यान कसं करणार? असा प्रश्न अनेकांना पडतो.

आज तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही आलो आहोत. जाणून घेऊया कसं करावं मन एकाग्र.

ध्यानाचे फायदे

बीपी, निद्रानाश, ताण, डिप्रेशन असे अनेक आजार बरे करण्याची ताकद ध्यानात म्हणजेच मेडिटेशनमध्ये आहे.

त्यामुळे मन शांत आणि एकाग्रता वाढण्यासाठी, बुद्धी तल्लक होण्यासाठी ध्यान फार उपयुक्त ठरतं.

ध्यानाचे मानसिक आणि शारीरिक फायदे आहेतच.

पण त्याबरोबर ध्यानासाठी शिस्त आणि सतत नियमित प्रयत्न करणे आवश्यक असते.

नियमित ध्यानाने मन प्रसन्न होते.


मंत्र जप करा

मेडिटेशनच्या सुरुवातीला मंत्र जप करा. त्यामुळे मन शांत होते. विचार कमी होतात.

शांत जागा निवडा

मेडिटेशनसाठी जागा निवडताना जिथे बाहेरचे आवाज नसतील, कोणाचं डिस्टर्बंस होणार नाही अशी शांत जागा निवडावी.

योगासन प्राणायाम

मन शांत आणि एकाग्र होण्यासाठी शरीरही रिलॅक्स असणं आवश्यक असतं. त्यासाठी ध्यानाला बसण्यापूर्वी योगासने आणि प्राणायाम करावा. त्यामुळे मन आणि शरीर दोन्हीही रिलॅक्स होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *