![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ एप्रिल । सोने-चांदी (Gold Silver Price Update) अथवा दागिने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सोने आणि चांदीच्या भावात चढउतार सुरुच आहे. सलग दोन दिवसांच्या घसरणीला आता ब्रेक लागला आहे. दोन्ही धातूत आता दरवाढ झाली आहे. भावात किंचित बदल झाला असला तरी खरेदी करताना त्याचा फटका बसतो. आज दिल्लीतील बाजारात सोने 60613 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74940 रुपये प्रति किलो भावाने विक्री होत आहे. या किंमतीत अजून वाढीचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दिवाळीपासून दोन्ही धातूंनी दरवाढीची सलामी दिली आहे. हे वर्ष, 2023 गुंतवणूकदारांसाठी लकी ठरले आहे. गेल्या दुसऱ्या पर्यांयापेक्षा सोने-चांदीने बक्कळ कमाई करुन दिली आहे. सोने-चांदीने खरेदीदारांना झटपट श्रीमंत केले आहे. इतर ठिकाणी केलेल्या गुंतवणूकीपेक्षा सोने आणि चांदीतील गुंतवणुकीने अधिक परतावा दिला आहे.
बुधवारी काय होते भाव
बुधवारी सोने 223 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आणि हा भाव 60613 रुपयांवर पोहचला तर मंगळवारी हा भाव 60390 रुपये प्रति 10 ग्रॅम महाग होता. सोन्यासोबतच चांदीने पण दरवाढीची वर्दी दिली. बुधवारी चांदी 524 रुपयांनी वधारली तर मंगळवारी भावात 391 रुपये रुपयांची घसरण झाली होती.
आजचा भाव काय
गुडरिटर्न्सने,गुरुवारी सकाळच्या सत्रातील भाव जाहीर केले. त्यानुसार, सकाळाच्या सत्रात आज दोन्ही धातूंमध्ये दरवाढ झाली. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे भाव 10 रुपयांनी वाढले. 22 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव आज 56,36 रुपये आहे. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 10 रुपयांनी महागली. आज हा भाव 61,470 रुपये आहे.
