महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ एप्रिल । आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचा धाकटा भाऊ अर्जुन यांनी आपले वडील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करत घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली.
याप्रकरणी रवींद्र यांनी शिवाजीनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आमदार संदीप व अर्जुन यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. मागील काही महिन्यांपासून आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या वडिलांमध्ये बेबनाव असल्याची व कुटुंबात कलह सुरू असल्याची चर्चा होती. मंगळवारी सकाळी रवींद्र यांच्या भगिनी त्यांच्या नगर रोडवरील घरी आल्या होत्या. या वेळी आमदार संदीप आणि अर्जुन या दोन भावांनी आत्याला इथे का बोलावले? असे म्हणत रवींद्र यांना बहिणीसमोरच धक्काबुक्की केली. त्यानंतर रवींद्र यांनी थेट शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. यावरून अदखलपात्र गुन्हा नोंद केला गेला आहे, असे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले म्हणाले.