सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर, 510 कोटींसह वाय एस जगन रेड्डी अग्रस्थानी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ एप्रिल । असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (Association for Democratic Reforms) देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. ADR ने निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या आधारे ही यादी जाहीर केली असून यामध्ये देशातील 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्याचा समावेश आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. 510 कोटींच्या संपत्तीसह या यादीत ते अग्रस्थानी आहेत. यादीनुसार 30 पैकी 29 मुख्यमंत्री करोडपती आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या एकमेव करोडपती नसणाऱ्या मुख्यमंत्री असून त्यांची संपत्ती एकूण 15 लाख इतकी आहे.

ADR रिपोर्टनुसार, 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 (97 टक्के) जण करोडपती असून प्रत्येक मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता ₹33.96 कोटी आहे. ADR अहवालानुसार, 30 मुख्यमंत्र्यांपैकी 13 (43 टक्के) जणांनी आपल्यावर खून, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि गुन्हेगारी धमकावणे यासह गंभीर गुन्हे दाखल असल्याचं जाहीर केलं आहे.

श्रीमंतांच्या या यादीत आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी (510 कोटी), अरुणाचल प्रदेशचे प्रेमा खांडू (163 कोटी) आणि ओडिशाचे नवीन पटनाईक (63 कोटी) हे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.


दरम्यान सर्वात खालच्या स्थानी म्हणजेच शेवटच्या तीन मुख्यमंत्र्यांमध्ये पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी (15 लाख), केरळचे पिनराई विजयन (1 कोटी) आणि हरियाणाचे मनोहरलाल (1 कोटी) यांचा समावेश आहे.

 

एकनाथ शिंदे कितव्या क्रमांकावर?
ADR रिपोर्टनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे तब्बल 11 कोटींची संपत्ती आहे. त्यामुळे करोडपती मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे.

अहवालानुसार, 46 वर्षीय मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे 510 कोटींहून अधिक संपत्ती आहे. त्यांचे स्वत:चे उत्पन्न 50 कोटींहून अधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्री पेमा खांडू असून त्यांचे स्वत:चे उत्पन्न आणि दायित्व शून्य आहे. त्यांची एकूण संपत्ती 163 कोटींहून अधिक आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वतःचे उत्पन्न 2 लाखांहून अधिक असून एकूण संपत्ती 3 कोटींहून अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *