12 श्रीसेवकांचा मृत्यू; धर्माधिकारी यांच्या घरातही दुखवटा, रांगोळी आणि घरावरील फुलांची सजावट हटवली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ एप्रिल । डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा नवी मुंबईच्या खारघर कॉर्पारेट पार्क मैदानात झाला. मात्र या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा १२ वर पोहोचला आहे.

मुख्यमंत्री यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केली असली तरी अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून या घडलेल्या प्रकाराबद्दल कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, या घडलेल्या दुर्दैवी घटनेप्रकरणी धर्माधिकारी कुटुंबाकडून दुखवटा पाळण्यात आला आहे. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील घरासमोरील रांगोळी आणि घरावरील फुलांची सजावटही काढण्यात आली आहे. अजूनही अनेकजण अत्यस्वस्थ असल्याने नवी मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात या श्रीसेवकांवर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या श्री सदस्यांना भेट दिली. यासोबतच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री रुग्णालायत जाऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर मनसेचे नेते राज ठाकरे हे सुद्धा रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *