महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – पी. के. महाजन – टाळेबंदी मुळे किंवा काही ही कारणास्तव ज्या करदात्यांचे आर्थीक वर्ष 2018-19 चे आयकर विवरण पत्रक (ITR) दाखल करायचे राहीले असेल , त्यां करदात्यांना सदर ITR लेट ( उशीरा) फी रु.10,000/_ भरुन येत्या 30 जुन 2020 पर्यंत दाखल करता येणार आहे. तसेच जो कर भरायला येईल त्या वरील व्याज वार्षिक 12% ऐवजी 9% ने च भरावा लागणार आहे. तरी गरजुंनी हया सवलतीचा फायदा घेतला पाहिजे कारण 30 जुन नंतर लेट फी भरुन सुद्धा सदर ITR दाखल करता येणार नाही.आर्थीक वर्ष 2019-20..साठी ITR दाखल करायची मुदत 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवली आहे.
शिवाय काही महत्वाच्या सवलतीं करदात्यांना देण्यात आल्या आहेत त्या पुढील प्रमाणे:—- # कलम 80 C च्या अंतर्गत कर सुट मिळवण्यासाठी जी गुंतवणूक करावी लागते तीची मुदत 30 जून 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.त्या मूळे कलम 80Cच्या अंतर्गत LIC. PPF. Mediclaim इत्यादी सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करून करात सुट मिळवण्या चा लाभ घेतां येईल. # F.Y.2019- 20 साठी ऍडव्हान्स टॅक्स भरायची मुदत मार्च 2020 वरुन 30 जुन 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. # हया दिलेल्या सवलतींचा लाभ घेता यावा
म्हणुन त्या नुसार ITR दाखल करायच्या पत्रकां मध्ये बदल करण्या त आला आहे.