महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी- संजीवकुमार गायकवाड – उदगीर- सध्याच्या परिस्थितीत मुंबई ,पूणे, येथे होणारे उपचार उदगीर मधे उपलब्ध होणार असल्याने सुपर स्पेशालिस्ट लाईफ केअर हाँस्पिटल रुग्णासाठी संजिवनी ठरणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम ,पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगीतले, शनिवारी ता, 30, येथिल लाईफ केअर हाँस्पिटलचा नव्याने प्रारंभ साई मुर्तीच्या प्रतिष्ठापनेने करन्यात आला, अध्यक्षस्थानी माजी आमदार सुधाकर भालेराव होते, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव,बस्वराज पाटील नागराळकर, माजी आमदार टी पी कांबळे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे , नागनाथ निडवदे, रामचंद्र तिरूके, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले,भाजपाच्या जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, जया काबरा , संतोष तिडके, धर्मपाल देवशेट्टे, मन्मथअप्पा किडे, अादी मंडळी यावेळी उपस्थित होती,
या प्रसंगी डायलिसीस विभाग, शस्त्रक्रीया विभाग, नेत्र विभाग, अस्थिशल्य विभागाचा प्रारंभ श्री,बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला .नव्याने पुन्हा सुरु करण्यात येणार्या सर्व उपक्रमांची त्यानी पाहणी केली , श्री संजय बनसोडे म्हनाले , की शहरात परिचारीका महाविद्यालयासह वैद्यकीय महाविद्याल सुरु करण्याकरिता पुर्ण सहकार्य करु. श्री , भालेराव यांना साखर कारखाना काढून पैसे कमावणे सहज शक्य होते,मात्र त्यांनी आरोग्य प्रकल्प हाती घेऊन सेवा करनण्याचे ठरविले हे कौतुकास्पद आहे. श्री भालेराव म्हनाले की, ग्रामीण भागातील जनतेला आयूष्मान भारत योजनेच्या माध्यमातुन सर्व उपचार मोफत मिळतील, उदगीर व जळकोट या तालुक्यातील एक लाख अठ्ठेचालीस हजार रूग्णांना या योजनेचा लाभ घेता येनार आहे, माजी ग्रहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर,आनी डाँ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे स्वप्न हेते ते पुर्ण करण्याचा विश्वास देतो असे त्यांनी सांगितले.