महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ एप्रिल । यंदा अक्षय्य तृतीया २२ एप्रिलला म्हणजेच आज शनिवारी साजरी केली जात आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी करण्याची परंपरा आहे. त्यात पौराणिक मान्यताही आहे. यंदाच्या अक्षय्य तृतीयेला गुरूच्या राशीतही बदल आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने, चांदी, दागिने, वाहन, घर, दुकान, फ्लॅट, प्लॉट इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच या दिवशी सोने खरेदी करणे आणि परिधान करणे सर्वात शुभ मानले जाते. लोक अक्षय्य तृतीयेला सोने का खरेदी करतात आणि यंदा अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे जाणून घेऊ यात.
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीसाठी कोणता मुहूर्त असेल?
ऋषिकेश पंचांगानुसार ज्यांना अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करायचे आहे ते शनिवार २२ एप्रिल रोजी सकाळी ८:०४ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी रविवार २३ एप्रिलला सकाळी ८ वाजेपर्यंत करू शकतात. या दिवशी दागिने खरेदी करून परिधान केल्यास अकाली मृत्यूचा धोका कमी होतो. हा २४ तासांचा काळ त्रेतायुगाचा योग बनवतो. यामध्ये भगवान परशुराम आणि राम यांचा जन्म झाला. हे वर्षातून एकदाच घडते.
२२ एप्रिलला अक्षय्य तृतीया मुहूर्त किती वाजता सुरू झाला?
ऋषिकेश पंचांगानुसार अक्षय्य तृतीया शनिवार २२ एप्रिल रोजी सकाळी ८:०४ पासून सुरू झाला आहे, जो रविवार २३ एप्रिल रोजी सकाळी ८:०८ पर्यंत राहील. या शुभ योगात दान पूर्ण करणे आणि स्नान करणे खूप महत्त्वाचे आहे. याने पुण्य प्राप्त होते आणि संकटे दूर होतात. धार्मिक स्थळांना भेटी देऊन गोरगरीब, असहाय्य, गरजूंना दान देऊन सद्गुणाचा भाग कमावला पाहिजे, असेही ते सांगतात.