![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ एप्रिल । देशात ५ जी इंटरनेट सेवेबद्दल मोठा गाजावाजा झाला, परंतु देशातील ८०० हून जास्त पोस्ट कार्यालयात अद्यापही इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यात महाराष्ट्रातील १०१ पोस्ट कार्यालयांची हीच स्थिती आहे.
दूरसंचार मंत्रालयाच्या अहवालातून ही माहिती उजेडात आली आहे. इंटरनेट नसलेल्या देशातील सर्व टपाल कार्यालयांना तत्काळ ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मंत्रालयाने सर्व राज्यांच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. इंटरनेटपासून दूर असलेल्या पोस्टांची संख्या ८७९ आहे. त्यात ईशान्येतील अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, नागालँडमध्ये सर्वाधिक १५२ टपाल कार्यालये आहेत.
विना इंटरनेटचे पोस्ट ऑफिस व राज्ये
ईशान्येकडील राज्ये : १५२ जम्मू-काश्मीर व लडाख ११५, पश्चिम बंगाल-१०६, महाराष्ट्र-१०१, छत्तीसगड-९५, दिल्ली-०९, गुजरात-०८, झारखंड-२९, हिमाचल प्रदेश १७, बिहार-१२, हरियाणा-१, राजस्थान-२, उत्तर प्रदेश-९, उत्तराखंड-३४, इतर-१८९, एकूण-८७९