Amruta Fadanvis: अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आवडेल का ? अमृता फडणवीस म्हणाल्या………

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ एप्रिल । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘सकाळ’ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विचारले असता त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं आहे.

त्या म्हणाल्या की, “अजित पवारच नाहीत तर महाराष्ट्रासाठी 24 तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल”. पुण्यातील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता.


काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

“मला कोणीही मुख्यमंत्री झाले तर आवडेल. महाराष्ट्रासाठी 24 तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल”, असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं आहे. अजित पवार जर भाजपमध्ये आले आणि त्यांनी भाजपमध्ये येऊन मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर या प्रश्नावर त्या म्हणाल्या, मला वाटतं महाराष्ट्र असं राज्य आहे जे खूप काही करू शकतं. खूप काही करत आहे. यासाठी जो माणूस आपल्याला जनतेला पुढे नेतो तो व्यक्ती किंवा पक्ष चांगला आहे. मग तो कोणीही असला तरी चालेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *