महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ एप्रिल । MS Dhoni Retirement CSK, IPL 2023: महेंद्रसिंग धोनीला समजणे अवघडच नाही तर अशक्य आहे. ही ओळ थोडी फिल्मी वाटू शकते, पण हा डायलॉग सध्याच्या परिस्थितीशी मिळते-जुळते आहे. IPL 2023 मध्ये धोनी आपल्या विजयी लयीने चाहत्यांना आनंद देत असेल, पण धोनीने सामन्यानंतर बोललेल्या शब्दांनी मात्र अनेक चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. गेल्या 48 तासांत सलग दुसऱ्यांदा धोनीने निवृत्तीबाबत भाष्य केलं आणि सारेच अवाक झाले.
शहर बदलले, CSK चे प्रतिस्पर्धी बदलले, पण एमएस धोनीचा सूर बदललेला दिसला नाही. 23 एप्रिलच्या संध्याकाळी, कोलकात्यात ते 21 एप्रिल रोजी चेन्नईमध्ये बोलले होते, तीच बोलीभाषा तो पुन्हा बोलताना दिसला. दोन्ही ठिकाणी त्याच्या बोलण्यातून नक्की त्याला म्हणायचंय तरी काय हे समजले नाही.
The entry of MS Dhoni in Eden Gardens. pic.twitter.com/AXVR1XbSN2
— Johns. (@CricCrazyJohns) April 23, 2023
प्रश्न असा आहे की धोनीने कोलकात्यात अशा गोष्टी सांगितल्या, जे यापूर्वी त्याने चेन्नईतही सांगितले होते. त्याने काल कोलकातामध्येही विधान केले. कोलकाता हा केकेआरचा बालेकिल्ला आहे, पण इथल्यापेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम पाहून धोनीने चाहत्यांचे आभार मानले. पण आता त्याने खरी गोष्ट सांगितली. कोलकाताच्या लोकांना तो म्हणाला, “मला तुमचा पाठिंबा आणि प्रेम मिळाले हे चांगले झाले. पण, पुढच्या वेळी तुम्ही केकेआरच्या जर्सीमध्ये या. तुम्ही स्वत:च्या टीमला पाठिंबा देण्यासाठी या.”
तो पुढे म्हणाला, “मला माहित आहे की तुम्हा सर्वांना मला फेअरवेल द्यायचा आहे आणि म्हणूनच तुम्ही पिवळ्या जर्सीमध्ये आला आहात. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.” धोनीच्या मते, कोलकात्यात पिवळ्या जर्सीमध्ये मोठ्या संख्येने लोक दिसणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे.