महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – केरळ – विशेष प्रतिनिधी – अजय सिंग – लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असले तरी अद्याप शाळा-कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असून, महामारी संकटाच्या काळात शाळा कशा सुरू करायचा असा प्रश्न राज्यांसमोर आहे. यावर केरळ सरकारने उपाय शोधून काढला आहे. केरळ सरकारने केरळ इंफ्रास्ट्रक्चर अँड टेक्नोलॉजी फॉर एज्युकेशन (केआयटीई) विक्टर्स चॅनेल अंतर्गत फर्स्ट बेल नावाने डिजिटल क्लासेस सुरू केले आहेत. हे क्लासेस विक्टर्सच्या चॅनेल, वेबसाईट, मोबाईल अॅप आणि सोशल मीडियावर पेजेसवर उपलब्ध असतील.
मल्याळम आणि इंग्रजीमधील सत्र सकाळी 8.30 वाजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतचे (अकरावी सोडून) विद्यार्थी लाईव्ह अथवा डाऊनलोड करून हे सत्र पाहू शकतील.
Watched some spectacular online classes from Kerala Education department. Great quality!https://t.co/nBJvOPMlhM
— Ullas (@ullasts) June 1, 2020
पब्लिक इंस्ट्रक्शनचे डायरेक्टर के जीवन बाबू म्हणाले की, कोव्हिड-19 ची स्थिती किती धोकादायक आहे आपल्याला माहिती आहे. नेहमीप्रमाणे शाळा सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही ऑनलाईन क्लासेस सुरू केले. आम्ही सर्व शिक्षक आणि मुख्यध्यापकांना सांगितले आहे की विद्यार्थ्यांकडे क्लासेससाठी टिव्ही, स्मार्टफोन, कॉम्प्युटर आणि इंटरनेट असेल याची काळजी घ्यावी. अन्यथा विद्यार्थी हे सत्र पाहू शकतील असा पर्याय शोधावा.
या क्लासेससाठी 1.20 लाख लॅपटॉप्स आणि 4450 टिव्ही सेट्स शाळांना देण्यात आले आहेत. दुर्गम भागात सुविधा नसल्यास लायब्रेरी अथवा अक्षया सेंटर्सचा वापर करण्यास सांगितले आहे.