महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ एप्रिल । मलायका अरोरा आपल्या अभिनयापेक्षा तिची वक्तव्ये व खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. मलायकाच्या फिटनेसचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे तिचे जिमबाहेरील व योगा स्टुडिओबाहेरील व्हिडीओही खूप व्हायरल होत असतात. बऱ्याचदा तिच्या चालण्याच्या स्टाइलवरून नेटकरी तिला ट्रोल करतात. एकदा तर राखी सावंतनेही तिच्या ‘डक वॉक’ म्हणजेच बदकासारख्या चालीची खिल्ली उडवली होती.
मलायका अरोराने पहिल्यांदाच तिच्या चालीवरून उडणाऱ्या खिल्लीबद्दल भाष्य केलं आहे. ‘मुव्हिंग इन विथ मलायका’च्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्रीने स्टँडअप कॉमेडी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिने ट्रोल्सना चोख प्रत्युत्तर दिले. अर्जुन कपूरशी असलेल्या नात्याशिवाय मलायका अरोराने तिच्या प्रसिद्ध डक वॉकवरही प्रतिक्रिया दिली. मलायका अरोराचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणली, “माझ्याजवळ घट्ट नितंब आहेत, ज्यावर मी सात वेळचे जेवण वाढू शकते, तर मी बदकाप्रमाणे का चालू शकत नाही? खरं तर मी बदक, मांजर, चित्ता यांच्यासारखं चालू शकते.”
यावेळी तिने अरबाज खान व तिच्या घटस्फोटाबद्दल बोलणाऱ्यांना सुनावलं. घटस्फोटित शब्दाचा उल्लेख करत म्हणाली की ती केवळ घटस्फोटित नाही तर एक उद्योजिका आणि आई देखील आहे परंतु लोक तिला नेहमी आठवण करून देतात की ती घटस्फोटित आहे. ती व अरबाज आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत, मग बाकीचे सगळे कधी पुढे जाणार? असा प्रश्नही ती विचारते.