वादळानंतरही राज्यात पावसाचा धूमधडाका ; या भागांमध्ये आजही सावधानतेचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरून पुढे सरकल्यानंतरही मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये रात्री आणि गुरुवारी सकाळी पावसानं झोडपलं आहे. ठाणे आणि उपगरांमध्ये गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर दक्षिण मुंबईत रिमझिम पाऊस आहे. दरम्यान आज मुंबईसह, ठाणे, उपनगर, कोकण, नाशिक, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

पुण्यात रात्री उशिरा पावसानं झोडपल्यानं मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून रस्त्यावर पडली आहे. पावसानं जोर धरल्यानं अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वसई-विरारमध्ये गुरुवारी सकाळपासून दमदार हजेरी लावली. वसईत 22 मीमी माणिकपूर 24 मिमी मांडवी 24 मिमी ,विरार 26 निर्मळ 19 मिमी,पावसाची नोंद झाली असून बुधवारपासू पावसामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

निसर्ग चक्रीवादळ बुधवारी संध्याकाळी नाशिककडे सरकल्यानं वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रामकुंड, सीताकुंड,लक्ष्मण कुंड, गांधीतलाव पाण्याखाली गेलं आहे. शहरातील ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहात आहेत.

निसर्ग वादळादरम्यान मुंबई-पुण्यासह अनेक भागांमध्ये झाडं उन्मळून पडल्याच्या आणि इमारतीचं छत, पत्रे उडाल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसानं झालं. या चक्रीवादळाचा मुंबईचा धोका टळला असला तरीही मुंबईसह कोकण किनारपट्टीवर आणि अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. या वादळात दोन जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *