महाराष्ट्र 24 ऑनलाईन : यमुनानगर येथील रनना रुग्णालय समोर अतिक्रमण कारवाई करण्यात आली त्या वेळी ९ टपरीधारक ह्यांच्या कडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका टपरी परवाना असताना सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी अतिक्रमण कारवाई केली यावेळी महापालिका सुरक्षा रक्षकांकडून येथे उपस्थित असलेल्या महिलांना दमदाटी करत बाजूला ढकलण्यात आले.
परिणामी संबंधित सुरक्षा रक्षकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे. त्या वेळी अतिक्रमण कारवाई करताना सुरक्षा रक्षक ह्यांनी महिला हातगाडी धारक ह्यांना दमदाटी करून पोलिस बळाचा वापर केला ह्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर ह्यांनी जाहीर निषेध व्यक्त करुन पोलिस बळाचा वापर न करण्याची फ क्षेत्रिय अधिकारी सिताराम भवरे ह्यांना ताकिद दिली आहे.