सी व्होटरचा सर्व्हे : महाराष्ट्राचा मूड मध्यावधीचा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ एप्रिल । एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांना सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवल्यास काय..? हा एकच प्रश्न सध्या महाराष्ट्रात चर्चिला जात आहे. सत्तासंघर्षाच्या या खटल्याचा निकाल लागण्यापूर्वी विविध पक्षांचे नेते, अभ्यासक, विश्लेषक वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘सी-व्होटर’ संस्थेने महाराष्ट्रात सर्वेक्षण करून जनतेचा कौल जाणून घेतला. यात सर्वाधिक ३२ टक्के लोकांनी इतर पक्षात फाेडाफोडी करून सरकार टिकवण्यापेक्षा सर्वच राजकीय पक्षांनी मुदतपूर्व निवडणुकांना सामोरे जाऊन नव्याने जनमताचा कौल घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अडीच वर्षांत सत्ता गमावणाऱ्या उद्धवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांचीही हीच मागणी आहे. भाजप व शिंदेसेनेला मात्र हा पर्याय मान्य नाही. एवढा खटाटोप करून आणलेल्या सरकारचा कोणत्याही परिस्थितीत कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी त्यांचा आग्रह आहे. म्हणून शिंदे पायउतार झाले तरी राष्ट्रपती राजवट लागू न होऊ देता नेतृत्व बदलून सरकार टिकवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *