Depression Causes : ‘या’ कारणांमुळे येऊ शकते डिप्रेशन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ एप्रिल । Depression Causes : सध्या बदलत्या लाईफस्टाईलनुसार डिप्रेशनची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण डिप्रेशनचा शिकार होत आहे. डिप्रेशन मुळात एक मानसिक स्थिती आहे ज्यामुळे आपल्याला त्रास होतो.

डिप्रेशनची लक्षणे आणि त्यावर कोणते उपाय करायचे? याविषयी आपण नेहमी जाणून घेतो पण तुम्हाला डिप्रेशनची कारणे माहिती आहे का? आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. या काही कारणांमुळे डिप्रेशन येऊ शकते त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे. (main causes for depression healthy lifestyle)

 

१. जर तुमच्या आजुबाजूला डिप्रेशन असेल, किंवा वातावरण उत्तम नसेल तर तुम्हाला डिप्रेशन येऊ शकते. त्यामुळे तुम्ही कोणत्या वातावरणात राहतात आणि वाढतात, हे जास्त महत्त्वाचं आहे.

२. जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडली असेल ज्याचा तुमच्या जीवनावर संपुर्णपणे नकारात्मक प्रभाव पडला असेल, तेव्हा तुम्हाला त्या घटनेमुळे डिप्रशेन येऊ शकते. अशाप्रकारचे डिप्रेशन लाईफटाईम तुमच्या आयुष्यावर परिणाम करत असते.

३. जर तुम्हाला दिर्घकाळ दुखणे किंवा आजार असेल तर तुम्ही डिप्रेशनचा शिकार होऊ शकता.

४. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल किंवा तुमची झोप अपूर्ण होत असेल तर तुम्हाला डिप्रेशन येऊ शकते.

५. जर तुम्हाला व्यसन असेल तर तुम्हाला डिप्रेशन येऊ शकते. विशेषत: ड्रग्सच्या सेवनामुळे अनेकजण डिप्रेशनचा शिकार होतात.

६. याशिवाय स्वत:ला कमी समजणे, यामुळेही डिप्रेशन येऊ शकते.

७. आर्थिक समस्येमुळे डिप्रेशन येण्याची शक्यता असते.

८. नातेसंबंधात तणाव, वैवाहीक आयुष्यात अडचणी यामुळेही तुम्ही डिप्रेशनचा शिकार होऊ शकता.

९. एखाद्या आजारने ग्रस्त असाल तर वारंवार इंजेक्शन आणि औषधांमुळे तुम्हाला डिप्रेशन येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *