68 वे फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023:आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर राजकुमार राव ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ एप्रिल । भारतीय सिनेसृष्टीतील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यंदा या सोहळ्याचे 68 वे वर्ष आहे. 27 एप्रिल रोजी संध्याकाळी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. रेड कार्पेटपासून ते स्टेजपर्यंत बॉलिवूड स्टार्सचा जलवा लक्ष वेधून घेणारा होता. अभिनेता सलमान खानने या सोहळ्यात सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडली तर आयुष्मान खुराणा आणि मनीष पॉल यांचीही साथ त्याला मिळाली.

या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टचा गाजलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर याच चित्रपटासाठी आलियाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली.


यंदा ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘बधाई दो’ या चित्रपटांचा फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये जलवा राहिला. संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ने तब्बल 10 श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले, तर हर्षवर्धन कुलकर्णींच्या ‘बधाई दो’ने क्रिटीक्स अवॉर्ड श्रेणीत सर्वाधिक सहा पुरस्कार जिंकले. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र: भाग-1 शिवा’ या चित्रपटालाही चार श्रेणीत पुरस्कार मिळाले आहेत. तर ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी…

सर्वोत्कृष्ट चित्रपट : गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : राजकुमार राव (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : अनिल कपूर (जुग जुग जियो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शीबा चड्ढा (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट संवाद : प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षणी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट पटकथा : अक्षय घिल्डियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजित सिंह (‘ब्रह्मास्त्र’मधील ‘केसरिया’ गाणे)
सर्वोत्कृष्ट कथा : अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) : भूमी पेडणेकर (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) : तब्बू (भूलभुलैय्या 2)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) : हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) : संजय मिश्रा (वध)
फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2023 : प्रेम चोप्रा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *